Top News

"त्या दोन्ही" कंत्राटी कामगारांच्या मृत्युस जबाबदार #chandrapur

वेकोलि सेफ्टी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा:- हंसराज अहीर

मृतकांच्या कुटुंबियांना व जखमींना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी
चंद्रपूर:- वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती कोलमाईन्स परिसरातील धोपटाळा काॅलनीतील गटार सफाई करणाऱ्या दोन कंत्राटी कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूस वेकोलिचे सुरक्षा अधिकारी पुर्णतः जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधीत सेफटी अधिकाऱ्यांची सखोल चैकशी करून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केली आहे.
दि. 22 मार्च रोजी सदर दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच हंसराज अहीर यांनी घटनास्थळी पोहोचुन या अपघाताची माहिती घेतली. वेकोलि अधिकाऱ्यांनी सुरक्षा विषयक बाबींची काळजी न घेतल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप करीत त्यांनी या संपूर्ण प्रकारास घटनास्थळावर उपस्थित असलेले वेकोलिचे सेफटी अधिकारीच जबाबदार असल्याचे सांगत संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी भूमिका घेतली आहे.
धोपटाळा काॅलनीतील बंद गटारांमधील गाळ उपसण्यापूर्वी वेकोलि अधिकाऱ्यांनी किंवा संबंधीत कंत्राटदारांनी सुरक्षेबाबत उपाययोजना करणे गरजेचे असतांना याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे गाळ उपसण्यासाठी गेलेल्या कामगाराचा व त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या कंत्राटी कामगाराचा नाहक बळी गेला. या दोन्ही कंत्राटी कामगारांचे रेस्क्यु आॅपरेशन करतांना वेकोलिचा रेस्क्यु टीम मधील एक कामगार सुध्दा विषारी वायुने बाधीत झाल्याने त्याला नागपुरला रेफर केले असून त्याची प्रकृतीसुध्दा गंभीर असल्याचे समजते.
या रेस्क्यु टीम मधील अन्य दोघांच्या प्रकृतीची हंसराज अहीर यांनी भेट घेतली असता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. परंतू घडलेला एकंदरीत प्रकार अत्यंत गंभीर असल्याने या दुर्घटनेस वेकोलिचे सेफटी अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचेवर कारवाई होण्याच्या गरजेवर भर देवून या दर्घटनेत मृत पावलेल्या राजु जर्जुला व रामजी खंडारकर या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना तसेच जखमींना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही हंसराज अहीर यांनी घटनास्थळाला भेट देवून केली आहे. या भेटीप्रसंगी भाजपा नेते खुशाल बोंडे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाघ्यक्ष राजु घरोटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने