Top News

चंद्रपूरात पारा भडकला, तापमान ४३ डिग्री सेल्सिअसवर #chandrapur

विदर्भात ४८ तास उष्णतेच्या लाटेचे!
चंद्रपूर:- काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. सध्या उष्णतेची लाट हळूहळू वाढत आहे. विदर्भात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 43 डिग्री सेल्सिअस वर गेले. येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर येत्या 48 तासांत विदर्भातील बहुतांशी भागात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. घराबाहेर पडायचंच असेल, तर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
उन्हापासून बचावासाठी तयारी...

तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. याचा परिणाम म्हणून उष्णतेत वाढ झालीय. विदर्भात बहुतेक सर्वच ठिकाणी कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पण तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळंच कुलर सुरू करण्यात आले आहे. एसीवाल्यांनी एसीही सुरू केली आहे. थंड पाणी मिळावं, यासाठी माठाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदरित उन्हापासून संरक्षण व्हावं, यासाठी काळजी घेतली जात आहे. विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पाऱ्याने चाळीशी क्रास केली आहे. चंद्रपुरात तर काल तापमान 43 डिग्री सेल्सिअस होतं. येत्या 48 तासात उष्णतेची लाट असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने