मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू #death

Bhairav Diwase
सिंदेवाही:- सिंदेवाही शहरातील चार किमी अंतरावर असलेल्या थकाबाई तलावात मासेमारी साठी गेलेल्या एका व्यक्तीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि . २६ मार्च शनिवार ला घडली.


सविस्तर वृत्त असे की, मृतकाचे नाव शंकर सदाशिव मेश्राम वय ५५ रा. सिंदेवाही असे आहे. सिंदेवाही शहरापासून चार कि. मी अंतरावरील थकाबाई तलाव आहे. या तलावात शंकर मेश्राम हा मासेमारी करण्यासाठी गेला होता. मासेमारी करीत असतानाच तो खोलवर तलावाच्या पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत तलावात मासेमारी करीत असलेल्या काही लोकांना दिसले असता या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली.



हि माहिती कळताच तात्काळ घटनास्थळी सिंदेवाही पोलीस दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.