चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत गुरुवारपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. सोमवारी देखील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या भिवापूर प्रभागातील (पठाणपुरा) नगरसेविका तथा झोन २ च्या सभापती खुशबू अंकुश चौधरी यांनी सोमवार दिनांक 28 मार्च रोजी महानगरपालिका कार्यालय समोर मटका फोडो आंदोलन केले.
हेही वाचा:- 24 तासात शहरातील पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा मनपाला कुलुप ठोकू:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur
चंद्रपूर शहरातील धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, मात्र महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात गुरुवारी पहिल्या दोन दिवसात पाइपलाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली होती.
सहा दिवस होऊनही पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मनपाच्या दुर्लक्षितपणा यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
हेही वाचा:- पाणीटंचाई विरोधात घागर फोडो आंदोलन
हेही वाचा:- महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली पाहणी
भिवापूर प्रभाग 14 नगरसेविका तथा झोनच्या सभापती चौधरी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष, शोभा वाघमारे, उषा वाघमारे यांच्या उपस्थित पठाणपुरा येथील महिलांनी आंदोलन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी प्रशासनाने केली.