जाहिरात... Advertisement... विज्ञापन

धाबा ते गोंडपिपरी चालू असलेल्या मार्गाच्या कामाच्या संबंधित भाजपा युवा मोर्चा तर्फे निवेदन #gondpipari


गोंडपिपरी:- धाबा ते गोंडपिपरी मार्गाचे काम करताना सदर कामाचा दर्जा हा निकृष्ट आहे. याबाबतीत संबंधित कंत्राटदाराला या अगोदर लक्षात आणुन देवून सुध्दा दुर्लक्ष करीत आहे. तसेच वारंवार सुरक्षेसंदर्भात सुचना देण्यात आल्या होत्या. परंतू कंत्राटदाराकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. धाबा ते गोंडपिपरी हा मार्ग प्रवाशांकरीता चालु असून सदर काम करतांना उडत असलेली धुळ यामुळे आरोग्यास हाणी तथा अपघात घडण्याची शक्यता नाकरता येत नाही व याअगोदर किरकोड अपघात झालेला आहे.
सदर कामावरील खोदकाम केलेल्या ठिकाणी बॅरीगेट न लावणे, आवश्यक त्या सुचनेचे फलक न लावणे, उडण्याच्या धुळीवर पाणी न मारणे अश्या अनेक काम करतांना सुरक्षा नियमाची पायमल्ली करून कामावर असलेले कामगार प्रवाशी व इतर नागरीकाची घ्यावयाची काळजी न घेता काम करीत असल्यामुळे जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करिता या आपण स्वतः आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी व होणाऱ्या कामाचा दर्जा योग्य असावा. धावा गावातील मुख्य मार्ग असलेला मोठा पुल ते लहाण पुल पर्यंत रस्त्यालगत कोंढाणा गावात प्रवेश रस्ता, मंगलपेठ गावात प्रवेश रस्ता, शासकीय कार्यालये, शाळा कॉलेजला रस्त्याने विद्यार्थी पायदळ जाणे, शासकीय दवाखाना, खागजी दवाखाना, दुकानलाईन, तलाठी कार्यालय, अंगणवाडी केंद्र, पोलीस स्टेशन, बस स्टैंड, श्री. संत कोंडय्या महाराज देवस्थान कडे वडनारा मुख्य रस्ता, पाणी पुरवठा यंत्रणा, वनविभाग कार्यालय, आठवडी बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्यालगत आहे. तसेच गावात जानारे मुख्य रस्ते जोडलेले असल्याने रहदारी हि दिवस रात्री असते जर मार्ग चालू झाल्यास अडचण निर्माण होवून अपघात होवून जिवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता धावा गावातील कोंडाणा फाटा पासुन ते लहान पुलापर्यंत डिवायडर रस्ता करण्यात यावा. यासाठी भाजपा युवा मोर्चा तर्फे जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी बोडलावार, ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी हरीश घोगरे, विठ्ठल चनकापुरे, आशिष मामीडपल्लीवार , निखिल चदनगीरीवार, गणेश बावणे, सुरज भस्की, विशाल बावणे, सुरज फरकडे आकाश पोटे, अनिकेत नामेवार, अखिल चंदनगीरवार, निखिल गंपलवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत