नागभीड:- तालुक्यातील येनोली माल गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धामणगाव माल येथील जंगल परिसरात वाघाने ६० वर्षीय वृद्धाला गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
वृद्ध इसमाचे नाव सोमाजी मडावी असे आहे. त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलविले असल्याची माहिती आहे. सदर वाघाचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पुढील तपास करीत आहेत