Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

शिवसैनिकांनी राजुऱ्यातलं युवा स्वाभिमान संघटनेचं ऑफिस फोडलं #chandrapur #rajura


चंद्रपूर:- युवा स्वाभिमानी पक्षाचे आ. रवी राणा व खा. नवनीत राणा ह्यांनी थेट मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहिर केल्यानंतर ह्या दाम्पत्याला अटकाव करण्यासाठी मुंबई येथील मातोश्री बाहेर मागील तीन दिवसांपासून शिवसैनिकांनी ठिय्या दिला होता व राणा दाम्पत्याला मातोश्रीवर येण्याचे खुले आव्हान दिले होते. आ. रवी राणा व खा. नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
ह्याच संदर्भात युवा स्वाभिमान पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे ह्यांनी फेसबुक वर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या बाबतीत अश्लील शब्दात टिका करून मुख्यमंत्र्यांना थेट लढतीचे आव्हान दिल्यामुळे बिथरलेल्या शिवसैनिकांनी रात्री 8:30 युवा स्वाभिमानी पक्षाच्या राजुरा येथील कार्यालयात धडक देऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करून तोडफोड केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत