जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चड्डा ट्रान्सपोर्टच्या MH34-1664 ने दिली बैलाला धडक, चारही पाय बेकामी #chandrapur #rajura


शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या मध्यस्थीने बैलमालकाला 25000 रुपयाची मदत
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- माथरा येथील शेतकरी बालाजी आबाजी चहारे यांच्या बैलाला चड्डा ट्रान्सपोर्टच्या MH34-1664 ने जोरदार धडक दिली. या घटनेत बैलाचे चारही पाय बेकामी झाले असून पूर्णपणे अपंग झालेला आहे. जडवाहतुकीसाठी हा रस्ता नसूनसुद्धा या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघात वाढत चालले आहे.
घटनेची माहिती मिडताच शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि ट्रान्सपोर्टमालकाशी संपर्क करून पीडित शेतकऱ्याला 25000 रुपयाची रोख मदत मिळवून दिली.
ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुपरवाईजर दशरथ चिकाठे यांनी ही मदत शिवसेना कार्यालयात जाऊन पीडित शेतकऱ्याला दिली.
याप्रसंगी युवासेनेचे उपाजिल्हाप्रमुख प्रदीप गेडाम, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर, माजी सरपंच माथरा लहू चहारे, सुधाकर धोटे, मंगेश जुनघरी आनंद चिताळे, गणेश ढोके, तिरुपती काटम आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत