25 लाखाचे नुकसान
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- शहरातील मुख्य बाजार रोड वरती असलेले स्नेहदिप रेडिमेड कपडे दुकानात काल मंगळवार ला रात्री आग लागून कपडे व फर्निचर जळून खाक झाले आहे. या आगीत जवळपास 25 लाखाचे नुकसान झाले आहे.
शेजाऱ्याला आग लागल्याची माहिती होतास दुकान मालकाला सांगण्यात आले असता मालकाने अग्नीशामक ला बोलावले परंतु तो पर्यंत उशीर झाले होते आणि दुसऱ्या मजली वरती आग लागली होती.
शॉट सर्किटमुळे ही आग लागली होती रात्री 10 चे सुमारास दुकान बंद करून घरी गेल्या वरती मालक राकेश नामेवार 11.30 चे सुमारास हि घटना घडली आहे. राजुरा चे अग्नीशामक व बल्लारपूर चे अग्नीशामक दलाने आग विझली.