Top News

अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून #murder chandrapur police #chandrapurpolice

भद्रावती:- भद्रावती येथील सुमठाना-तेलवासा मार्गावरील शाळेसमोरील शेतशिवारात 4 एप्रिल रोजी एका युवतीचा मुंडकं नसलेला निर्वस्त्र मृतदेह आढळून आला होता. या युवतीची हत्या द्वेष भावनेतून करण्यात आली असून, या प्रकरणी एका विधीसंघर्ष बालिकेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी शनिवार, 10 एप्रिल रोजी पत्रपरिषदेत दिली.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पथक तसेच सायबर सेलमधील सायबर तज्ज्ञ यांच्यामार्फत मृत युवतीच्या शरिरावरील खुन, मृतदेहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू आदींची शोधपत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. परंतु, उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे तांत्रिक तपास करण्यात आला.
अखेर गोपनिय माहितीदाराकडून या युवतीची ओळख पटविण्यात यश आले. तिचा भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त केल्यानंतर तिच्या राहत्या घराचा, नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील पत्ता मिळाला. त्यावरून तिच्या मोठ्या बहीणीशी संपर्क साधला असता शरीरावरील व्रण व वापरीतील वस्तू पाहून तिने ओळख सांगितली. या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी तिन वेगवेगळे पथके तयार करण्यात आले. तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य सूत्रधार असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेण्यात आले.
या बालिकेची चौकशी केली असता, मृत युवती व ती मैत्रीणी होत्या. त्या एकाच खोलीमध्ये राहत होत्या. काही महिन्यापासून वेगवेगळ्या कारणामुळे त्यांचे आपसात भांडण होत होते. मृत युवती तिचा इतर मित्रांसमोर अपमान करीत होती. त्यामुळे तिच्या मनात त्या युवतीबद्दल रोष निर्माण झाला आणि तिला अद्दल घडवायाचा तिने निश्‍चय केला. याबाबत तिच्या मित्राला तिने सांगितले. त्या दोघांनी मिळून तिला जिवे मारण्याच्या कट रचला. त्याप्रमाणे विधीसंघर्ष बालिकेने त्या युवतीला 3 एप्रिल रोजी रात्री 8:45 वाजता चंद्रपूर येथील वरोडा नाका येथे बोलवून घेतले. त्या ठिकाणावरून बालिकेच्या मित्राने दुुचाकीवर बसवून घटनास्थळी नेले.
रात्री 12 वाजताच्या सुमारास बालिकेने युवतीला मारहाण करून जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर तिचे पाय पकडून मांडीवर चाकूने दोन वार केले. आरोपी मित्राने पोटावर बसून प्रथम गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून दोघांनीही चाकूने आळीपाळीने तिचा गळा कापला तसेच तिचे पूर्ण कपडे व मुंडके घेऊन दूचाकीने पसार झाले, अशी माहिती साळवे यांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व संदीप कपडे, पोलिस उप निरीक्षक अतुल कावळे, सहायक फौजदार राजेंद्र खनके, हवालदार संजय आतकुलवार, सतिश बघमारे आदींनी केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने