Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पट्टेदार वाघाने मध्यरात्री घरात घुसून ८९ वर्षीय महिलेचा घेतला बळी #tiger #tigerattack

सिंदेवाही:- बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात गाढ झोपेत असलेल्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेवर पट्टेदार वाघाने घरात घुसून हल्ला चढविला. या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावात (दि. २७) मध्यरात्री घडली. तुळजाबाई परसराम पेंदाम (वय-८९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने चिकमारासह इतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतग्रत् तांबेगडी मेंढा उपक्षेत्रात चिकमारा गाव आहे. ८५४ लोकसंख्या असलेल्या छोट्याशा खेडेगावासभोवती जंगल आहे. याच जंगलात हिंस्र श्वापदांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या सुमारास थेट गावात येऊन जनावरांचा बळी वन्यप्राणी घेत असतात. हा प्रकार सुरू असताना काल बूधवारी चिकमारा येथील तुळजाबाई परसराम पेंदाम झोपल्या होत्या. या महिलेचे घर हे गावाच्या एका टोकाला असून तलावालगत आहे.

दोन खोल्याच्या घरी एक म्हातारी, एक मुलगा, एक सून, तीन नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी मध्यरात्री एका पट्टेदार वाघाने त्या म्हाताऱ्या महिलेच्या खोलीत प्रवेश केला. एकटीच झोपून असलेल्या ८९ वर्षीय तुळजाबाईवर हल्ला चढवून ठार केले. यावेळी मुलगा सुन आणि नातवंडे हे दुसऱ्या खोलीतच झोपून होते. वाघाने हल्ला चढविताच म्हातारीने आरडाओरड केला. आरडाओरडीचा आवाज मुलाला लक्षात येताच ते जागे झाले असता वाघ पळून गेला. अंगणात मुलाला वाघ दिसून आला. मात्र, म्हातारी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत