Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भीषण अपघातात दोघे ठार #accident

ट्रक चालक ट्रक घेउन फरार तर आणखी एका पिकअप ला धडक


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- शहराला लागून असलेल्या खिर्डी गावातील दोन मित्र नेहमी प्रमाणे सकाळी पायदळ फिरायला गेले असता मागून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिली त्यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला  ट्रक चालक ट्रक घेउन पसार झाला असून त्याच ट्रक ने समोर येऊन गडचांदूर शहराजवळ एका पिकअप ला धडक दिली.
महात्मा गांधी शाळेत शिक्षक असणारे धनराज मालेकर हे खिर्डी या गावी राहत असून त्यांनी कालच आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला घरातील परिवार आनंदात असतानाच आज सकाळीच त्यांच्यावर काळाने झडप दिली.
तर दुसरा शेखर ढवस हा खिर्डी गावचाच असून त्याचे मेडिकल स्टोर्स गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर आहे
दोघे ही एकाच गावातील असल्यामुळे दोघांची मित्रता ही अनेक वर्षांपासून होती दोघेही रोज पहाटेला पायदळ फिरायला जात असत मात्र आज दोन्ही मित्रावर एकाच वेळेस काळाने झडप घातली.
ही घटना गावात व आजूबाजूच्या गावात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली व तब्बल दोन अडीच तास रस्ता अडवून ठेवला ट्रक चालकास अटक करा अन्यथा  दोघांचेही शव उचलू न देण्याचा निर्धार नागरिकांनी घेतला.
पोलिसांनी  सीसीटीव्ही कॅमरे तपासून ट्रक चा शोध घेण्यात येत आहे  असे सांगितले 
पोलिसांच्या मध्यस्थीने वाहतूक सुरळीत करण्यात आली पोलीस मात्र ट्रकचा कसून शोध घेत आहे.
दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णयलयात हलवण्यात आले अशी माहिती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत