Top News

पडीत जमिनीवर गवत लागवड करून उमेद महिलांना मिळाले उत्पन्नाचे साधन #bhadrawati


मनरेगाचा नावीन्यपूर्ण उपक्रम; ग्राम पंचायतीचा पुढाकार
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वरोरा तालुक्यातील परसोडा येथे ग्राम पंचायतीने सार्वजनिक पडीत जागेवर गवत लागवड करून रोजगार निर्मितीचे साधन निर्माण केले आहे.
या माध्यमातून तयार झालेल्या गवताची कापणी व विक्री स्टॉलचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच संदीप दडमल होते. त्यावेळी मंचावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, गट विकास अधिकारी राजेश राठोड, सहाय्यक गट विकास अधिकारी संजय वानखेडे, माजी जि. प.सदस्य ज्योती वाकडे, माजी सभापती रवींद्र धोपटे, पशु धन अधिकारीडॉ. नेवारे, कृषी अधिकारी ठाकरे,विस्तार अधिकारी चनफणे, माधुरी येरमे,राजू चिकटे, मिलिंद भोयर,उपसरपंच रमेश पावडे, सरपंच संघटना अध्यक्ष पावडे,ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष खरवडे, प्रभाग संघ सचिव मनीषा पुसनाके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण मजुरांना रोजगार देण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातात. याअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मित्ताली शेठी यांचे मार्गदर्शनात गट विकास अधिकारी राठोड यांचे कल्पनेतून परसोडा येथे असलेल्या एक एकर पडीत जागेवर नेपियर गवत लागवड जानेवारी २०२२ मध्ये करण्यात आली. सदर गवत लागवडीसाठी मनरेगा योजने मधून खर्च करण्यात आला. गवत प्रकल्पाचे संगोपन करून उत्पन्न घेण्यासाठी उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शाश्वत विकास उत्पादक संघाची निवड करण्यात आली. तीन महिन्यात गवताची वाढ होऊन कापणी लायक गवत तयार झाले. या गवताच्या कापणी व विक्री स्टॉलचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते पार पडले. गवताची पशु पालकांना विक्री केली आणि मागणी सुद्धा नोंदविली . तसेच याप्रसंगी मनरेगा अंतर्गत महिलांना गवत प्रक्रिया करता यावी यासाठी वर्कशेडचे सुद्धा मान्यवरांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पशु संवर्धन विभागाने गवतापासून मूरघास कसे तयार करायचे याचा डेमो करून दाखविण्यात आला.
  कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविकातून गटविकास अधिकारी राठोड यांनी गवत लागवड संकल्पना सांगताना गवत लागवड हा मनरेगा अंतर्गत राबविण्यात आलेला नावीन्यपूर्ण उपक्रम असून यामुळे दुग्ध व पूरक व्यवसायाला चालना मिळून कुटुंबांचे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी गवत लागवड प्रकल्प राबविल्या बद्दल ग्राम पंचायत व पंचायत समिती अधिकारी व पदाधिकारी , उमेद तालुका टीम, ग्रामसंघ, उत्पादक संघ महिला, कॅडर यांचे अभिनंदन केले. या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली आणि दुग्ध व्यवसायास चालना मिळावी ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी असून इतरही ग्राम पंचायतीने असे शासनाचे विविध उपक्रम राबवून ग्राम विकास साधावा अशा अपेक्षा वक्त केली. उमेद गट ,ग्राम संघ व प्रभाग संघ यांचा ग्राम विकासात सहभाग घेऊन प्रत्येक कुटुंबाचे उत्पंनात भर घालावी असे आवाहन केले. सरपंच संदीप दडमल यांनीही याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल तालुक्यातील आबामक्ता, वायगाव (भो), बोडखा ग्राम पंचायत,मनरेगा व उमेद टीम, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, ग्रामसंघ, उत्पादक संघ, सी. आर. पी. , सरपंच व ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामस्थ यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मनरेगा, उमेद, कृषी , पशु, निर्मल भारत मिशन इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक , सक्षम प्रभागसंघ प्रतिनिधी, परसोडा व खैरगाव येथील महिला , कॅडर ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक बडवे यांनी केले. आभार ग्रामसेवक रुपेश गेडाम  यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसवेक व कर्मचारी, उमेद महिला यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने