💻

💻

माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांचा पुढाकारातून सुमित्राश नगर येथे बालउद्यान सह झाले प्रकाशमान #chandrapur


चंद्रपूर शहरातील सुमित्र नगर येथे बालउद्यान व हायमास्ट लाईटचे उद्घाटन
चंद्रपूर:- भगवान गौतम बुद्ध जयंती दिनी चंद्रपूर शहरातील सुमित्र नगर येथे ‘सुमित्र नगर बालउद्यान व हायमास्ट लाईट चे उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. आ. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा मार्गदर्शनातून नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांचा पुढाकारातून सुमित्र नगर येथे मुलांन करिता बालउद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. बालउद्याननिमितीमुळे परिसराची शोभा व आकर्षिता वाढली आहे. तसेच परिसर नेहमी प्रकाशित असावा याकरिता हायमास्ट लावण्यात आले.त्यामुळे येथील नागरिकांत उत्साह दिसून येत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचा सह माजी जि. प समाजकल्याण सभापती तथा भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन समारंभ प्रसंगी दहा नागरिकांना प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
आयोजित उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवर अध्यक्ष, भाजपा अनुसूचित जाती धम्मप्रकाश भस्मे, यशवंत उके, विनोद डबले, जितेंद्र वाकडे, रामचंद्र कासूलकर, लक्ष्मीकांत कांबडे, शांताराम पाटील, हरीश कासूलवार, मारोतराव हुलके, प्रभाकर आकेवार, बबनराव धर्मपरिवार , विजयराव चिताडे , बबनराव अंमुलवार, संदीप पाटील , शीला चौहान ,पुरुषोत्तम साहारे, प्रभाकर मत्ते. , मधुकर साळवे, मंजिरी ताई डबले , गणपतराव राखुंडे , जुबेर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यात सुधाकर बोंडे ,प्रशांत वारारकर , बंडू भाकरे ,वसंतराव धनधरे,बंडू गोहोकर , आकाश मस्के,धनराज कोवे ,मंजुश्री कासनगोट्टूवार ,धर्माजी खांगर , मुनेश्र्वर मुन , सतीश तायडे यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत