ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बहुजनहृदसम्राट एड.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करुन आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करुन स्वाभिमान दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आली. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या बहुजन समाजासाठीच्या स्वाभिमानी जनचळवळीवर प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर भद्रावतीकरांना शरबत वाटप करण्यात आले. या शुभप्रसंगी पक्षाचा सभासद नोंदणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला.
या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र कार्यकारी सदस्य कुशलभाऊ मेश्राम, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा कविताताई गौरकार, जिल्हा कार्यकारी सदस्य कपुर दुपारे, भद्रावती तालुकाध्यक्ष विजय इंगोले, तालुकाध्यक्षा संध्याताई पेटकर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक सुनील खोब्रागडे, नगरसेवक सुशिल देवगडे, नगरसेविका तथा शहराध्यक्षा राखीताई रामटेके, नगरसेविका सीमाताई ढेंगळे,तालुका सल्लागार सुधाकरजी शंभरकर, तालुका सल्लागार केवलदासजी ढोके, पवनबाबू गौरकार, रामचंद्र धोटे, हरिहर थुलकर, डि. एस. रामटेके, अरविंद घडले, नागनेश कुरेकार, संजय पाटील,अनुराग खाडे, अजय पाटील, विजय पाटील, चंद्रमणी गजभिये, राहुल गौरकार, राजू लभाणे, विशाल कांबळे, मुकेश तामगाडगे, भिमराव सांगोळे,प्रकाश पेटकर,पद्मा इल्लनदुल्ला, वैशाली चिमुरकर,आम्रपाली गावंडे, माया सहारे, वैशाली चहांदे, चंद्रकला गेडाम, सरोज खोब्रागडे, स्मिता इंदुरकर, शिल्पा घडले, मानसी शंभरकर, गिता वाळके, आशिष पाटील, अरुण कवाडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत