भेंडवी सहकारी संस्थेकडून खरीप हंगामासाठी एक कोटीचे पीककर्ज वाटप.

भेंडवी सहकारी संस्थेकडून खरीप हंगामासाठी एक कोटीचे पीककर्ज वाटप


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
राजुरा : सध्या खरीप हंगाम तोंडावर असून सहकारी शेतकऱ्यांची शेतीउपोयोगी साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे . भेंडवी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर पीककर्ज वितरित केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . संस्थेने आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त पीककर्जाचे वाटप केले आहे.
     भेंडवी सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील बहुतेक भाग हा आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखला जातो . त्यातच रब्बी हंगामावर वरुण राजाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे . पण या शेतकऱ्यांना भेंडवी आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थेने सर्वप्रथम पीककर्ज वाटप करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे . संस्थेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १०० शेतकरी सभासदांना एक कोटी ६ लाख रुपयांचे पीककर्ज वितरीत केले आहे .
पीककर्ज वितरणप्रसंगी गडचांदूर शाखा अधिकारी बी . एल. जोगी, शाखा निरीक्षक पी. आर. बलकी , संस्थेचे अध्यक्ष एस. के. कोटनाके, उपाध्यक्ष एस. एल. गोनेलवार, संचालक एस . एस. बतकमवार आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे , राजुरा व कोरपना तालुक्यात भेंडवी संस्थेने सर्वप्रथम पीककर्ज वाटप करून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत