Click Here...👇👇👇

प्रा. महेश पानसे "जीरो माइल आयकॉन अवार्ड २०२२" ने होणार सन्मानित.

Bhairav Diwase
प्रा. महेश पानसे "जीरो माइल आयकॉन अवार्ड २०२२" ने होणार सन्मानित


नागपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा. महेश पानसे यांनी जिरो माइल आयकॉन अवार्ड २०२२ ने सन्मानित केल्या जाणार आहे.
नागपूर शहरातुन गेल्या १६ वर्षांपासून जिरो माइल हे राष्ट्रीय हिंदी साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित होत आहे. यावर्षी हे वृत्तपत्र १७ व्या वर्षात पदार्पण करीत असुन वर्धापनदिनाचे औचित्य साधून, पत्रकारिता क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून मोलाची कामगिरी करीत अनेक नवख्या तरुणांना पत्रकारिता क्षेत्रात आणुन स्थिरावर करणारे, चंद्रपुर येथील पत्रकार, प्रा. महेश पानसे सर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर सोहळा १५ मे रोजी सकाळी ११ वाजता नागपुर शहरातील होटल हेरिटेज ओल्ड बिसीए ग्राउंडच्या जवळील परिसरात आयोजित केला असुन या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार निलेश राणे, माजी मंत्री रमेश बंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.