पोंभुर्णा येथे पहीले उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर (निशुल्क प्रवेश) #chandrapur


पोंभुर्णा:- तालुका क्रीडा संकुल समिती पोंभूर्णा चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमानाने पोंभुर्णा येथे पहिले उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर (निशुल्क प्रवेश) दिनांक १९ मे २०२२ ते ३१ मे २०२२ पर्यंत तालुका क्रिडा संकुल पोंभुर्णा येथे आयोजित करण्यात आले आहे.
पहिले उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर (निशुल्क प्रवेश) शिबिराची वेळ सकाळी ५:४५ ते सकाळी ७:३० तर सायंकाळी ५:३० ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
या शिबिरात योगा, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स (मैदानी खेळ), बॉल बॅडमिंटन, कुस्ती, कबड्डी, व्हालीबॉल या खेळांचा समावेश आहे. पाच वर्षाच्या पुढील व्यक्तींनी ११ मे २०२२ पासून १८ मे २०२२ पर्यंत सकाळी ८:३० ते १२:३० वाजेपर्यंत चिंतामणी कॉलेज पोंभुर्णा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग येथे नोंदणी करावी.
या शिबिराला प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. गिरीपुंजे, प्रा. संतोष कुमार शर्मा, प्रा. डॉ. नारनवरे, जयंत टेकाम, सुनिता ढुमणे, मोहन गुरनुले, शैलेश टेकाम, धीरज ओम सिंग, निखिल आरवेडवार, राकेश देवतळे, प्रिती ढुमणे तसेच सहयोगी म्हणून सुरज ढोले, क्रिष्णा सिडाम, क्रिष्णा बुरांडे, गौरव चंदेल, सचिन चौधरी, विशाल आत्राम, अक्षय सातपुते, अदनान कुरेशी, प्रतीक, लोकेश गव्हारे, संदीप उईके उपस्थित राहणार आहेत. पहिल्या उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर (निशुल्क प्रवेश) या शिबिराला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान तालुका क्रिडा संकुल समिती पोंभूर्णा चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क साधा:- 7083996750, 9421806838, 9834403917, 7972760245, 7262060546

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत