भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या बेमुदत उपोषणाला सुरवात #Korpana

नारंडा- अंतरगाव बु- कवठळा- नांदगाव सूर्या-पवनी रस्त्याकरिता उपोषण.

४ वर्षांपासून रस्त्याचे व पुलांचे काम अपूर्ण

कोरपना:- तालुक्यातील एन्यूटी हायब्रिड अंतर्गत सुरु असलेल्या नारंडा फाटा-अंतरगाव बु-सांगोडा फाटा-गाडेगाव-कवठाळा-नांदगाव सूर्या-पवनी ह्या रस्त्याचे काम मागील गेल्या ४ वर्षांपासून सुरू आहे परंतु सदर रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाहीत सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला तसेच १३ फेब्रुवारी २०२२ ला तालुक्यातील अंतरगाव बु येथे रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले तेव्हा अधिकारी व कंत्राटदारांनी लवकरात लवकर पुलाचे व रस्त्याचे बांधकाम पूर्ण करू असे सांगितले परंतु २ महिने लोटूनही काम पूर्ण झाले नाही त्यामुळे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी १० मे पासून अंतरगाव बु येथे बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.
यावेळी अंतरगाव बु ग्रामपंचायतच्या सरपंच सरिताताई पोडे,नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,हिरापूर माजी सरपंच प्रमोद कोडापे, वनोजा माजी सरपंच मंगेश लोहे,सांगोडा माजी सरपंच सचिन बोंडे, नारंडा माजी सरपंच वसंतराव ताजने,युवा नेते संदीप टोंगे,बंडू पाटील वडस्कर,गजानन लांडे,विठ्ठल जूनघरी,विशाल पावडे,अमोल भोंगळे, विनोद सूर,गोविंदा लांडे,नितीन पोडे,महेंद्र वडस्कर,प्रदीप उरकुडे,मारोती शेंडे,राजेंद्र आगलावे,बाळा गाडगे,मंगल खाडे यांची उपस्थिती होती.
यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता,तहसीलदार कोरपना, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन कोरपना यांना १८ एप्रिल २०२२ रोजी आमरण उपोषणाबाबत कळविले होते.
      सदर मार्गाचे काम २०१८ पासून सुरू आहे. मात्र या मार्गावरील रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण व पूलांचे कामे अद्यापही पूर्ण झाली नाही. त्यामुळे नियमित ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत असून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विविध  आजार जडले जात आहे. तसेच कोरपना तालुक्यातील नागरिकांना चंद्रपूरला ये-जा करण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा पडतो परंतु रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहन चालकांना सदर बाबीचा अतिशय जास्त फटका बसत आहे.तसेच पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात सुद्धा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच कोरपना तालुक्यातील नारंडा, वनोजा, कढोली, अंतरगाव, सांगोडा, गाडेगाव, येथील नागरिकांना याच मार्गवरून ये-जा करावी लागते परंतु रस्त्याचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे.
        या सर्व बाबी लक्षात घेता १० मे पासून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने सदर रस्त्याचे व पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत