Top News

मंत्री आले सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी #Korpana

तळा गळातल्या कार्यकर्त्याला जपणारा नेता
कोरपना:- पक्ष हा कार्यकर्त्याच्या मेहणतीवर अवलंबून आहे कार्यकर्ता हा पक्षाचा केंद्र बिंदू आहे अनेक पक्षात कार्यकर्त्याला नेत्यांना व मंत्र्यांना भेटण्यासाठी वेळच नसतो अशातच अनेक कार्यकर्त्यांची निराशा समोर येते याला अपवाद वगळता महाराष्ट्रात असा एक नेता आहे जो कार्यकर्त्याला आपल्या घरातला सदस्य मानतो म्हणूनच हा नेता महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे ते आहे लोकप्रिय नामदार राज्य मंत्री बच्चू कडू.
राज्यमंत्री बच्चू कडू हे दोन दिवस चंद्रपूर दौऱ्यावर असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील सीतागुडा (कोलामगुडा) या गावी कोलाम जनसंवाद घेण्यात आला मंत्री असून सुद्धा एका साधारण सामान्य व्यक्तीसारखे नेत्यांनी मुक्काम ठोकला त्याने प्रशासनाची धरपकड उडाली सत्तर वर्षाच्या काळात एखादाच मंत्री रात्री साडेबारा ला जाऊन त्याठिकाणी एक वाजता कार्यक्रम घेतो व रात्री सामान्य माणसाच्या खाटेवर झोपून रात्र काढतो शेवटच्या टोकावर असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात कोलाम गुडा या गावी कोलाम बांधवांसोबत  जनसंवाद व अनेक गावांना भेटी देऊन त्याबद्दल माहिती घेतली या दौऱ्यात कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील माजी तालुकाध्यक्ष बिडकर हे सुद्धा सोबत होते परतीच्या प्रवासात राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांनी बिडकर यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला व कुणालाही काही न कळता मंत्री महोदय यांचा ताफा गडचांदूर येथील गांधी चौकात येऊन थांबला अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की हा ताफा कुणाचा आहे मंत्री साहेब खाली उतरताच एकच जल्लोष सुरू झाला अनेक कार्यकर्त्यांची नागरिकांची मित्रमंडळींची गर्दी जमली व मंत्री महोदय सरळ आपल्या जुना कार्यकर्ता सतीश बिडकर यांच्या घरी जाऊन परिवाराला  भेट दिली साहेबांनी घरातील सर्व परिवाराला अभिनंदन व शुभेच्छा दिल्या गडचांदूर प्रथमच झालेल्या मंत्री महोदय बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्याने  त्यांचे डोळे पणावले मात्र मंत्रीमहोदयांनी कार्यकत्यांची नाळ कशी जोडलेली आहे हे या दौऱ्यातून दाखवून दिली याबद्दल बिडकर यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आपल्या घरी थेट देवाचे पाय पडले असे समजून त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता बच्चू भाऊ कडू यांचे  स्वागत  व सत्कार करण्यात आला मंत्रीमहोदयांनी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे बिडकरी यांच्या घरी वेळ दिला आणि  नंतर समोर चा प्रवास सुरू केला या प्रसंगी कोरपना तालुक्यातील  अनेक कार्यकर्ते मित्र परिवार  व जनसमुदाय उपस्थित होता 
प्रहार चे बिडकर बिडकर यांनी सांगितले की आज पर्यंत केलेल्या पक्षाची सर्व  सामाजिक व  राजकीय कामाची  पावती  या दौर्‍यावरून व  भेटीत आम्हाला मिळाली एक नेता असाही असतो की सामान्य कार्यकर्त्याच्या घरात एक ना एक दिवस नक्की जातो यावरूनच कार्यकर्त्यांची शक्ती किती तरी पटीने वाढते तीसुद्धा आता आमच्यात निर्माण झाली व आणखी जोमाने आम्ही पक्षासाठी व समाजासाठी कामे करू
सतीश बिडकर माजी तालुका अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने