💻

💻

कॉंग्रेस नेते तथा सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्षाचा भाजपात प्रवेश #chandrapur#saolinews #saoli

सावली:- तालुक्यातील व्याहाड (बु) येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष बाबुराव वासेकर यांनी आज व्याहाड (खुर्द) येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात सहर्ष स्वागत केले.
😁
यावेळी भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहुले, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, अर्जुन भोयर, माजी पं. स. उपसभापती रविन्द्र बोलीवार, नगरसेविका सौ. निलिमाताई सुरमवार, कविंद्र रोहणकर, कुनघाडकर सर, गणपत कोठारे यांचेसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत