मॅगी बनवताना भाऊ ओरडला #suicide

13 वर्षीय बहिणीने केली आत्महत्या
भंडारा:- भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या मैत्रिणींसमोर मोठा भाऊ ओरडला म्हणून 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर भागात घडली. सकाळी घरची मंडळी बाहेर कामासाठी गेली होती. यानंतर संबंधित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत घरात मॅगी करत होती. त्यावेळी तिचा मोठा भाऊ तिथे आला. घरात कशाला केरकचरा करता, असे म्हणत तिच्यावर रागावला. त्यामुळे तिच्या मैत्रिणी निघून गेली, तर भाऊ आंघोळीसाठी घराच्या मागच्या बाजूला गेला. याचा राग मनात तिने धरला. यानंतर तिने विश्वास बसणार नाही असं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
कुटुंबीय घराबाहेर होते. तर जो भाऊ तिच्यावर ओरडला तो अंघोळीला गेला. हीच वेळ साधत या अल्पवयीन मुलीने खोलीचे दार बंद केले. यानंतर घरात ओढणीने गळफास घेतला. यानंतर तिचा भाऊ आंघोळ करुन परत आला. तेव्हा दोन्ही दरवाजे बंद होते. त्यामुळे तिच्या भावाने खिडकीतून पाहिले तर ती मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. ते पाहून त्याला धक्काच बसला.
यानंतर आरडाओरड केल्यानंतर शेजारीही त्याठिकाणी जमा झाले. यानंतर दार तोडण्यात आले आणि उपस्थितांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. त्यावेळी ही मुलगी जिवंत होती. यानंतर लगेचच तिला भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु झाले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर भागात घडली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. तर या मुलीने अगदी क्षुल्लक कारणावरुन इतके टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत