🌄 💻

💻

गडचिरोलीत खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या #murder

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका इसमाची कु-हाडीने हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव रामजी तिम्मा (४० ) असून एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र हालेवारा अंतर्गत येत असलेल्या मेंढरी या गावातील रहिवासी आहे.
नक्षलवाद्यांनी हत्या करून मृत शरीराजवळ टाकलेल्या पत्रकात सदर मृतक आत्मसमर्पित नक्षल असून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. मागे झालेल्या घटनेत पोलिसांना सहकार्य करुन एका नक्षल कमांडरला (काँम्रेडला) मारण्यात मृतकाचा हात असल्याचा टाकलेल्या पत्रकात उल्लेख केलेला आहे.
सदर घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतकाची बॉडी ताब्यात घेवून एटापल्ली येथील रुग्णालयात शवविच्छेदन करून परिवाराला देण्यात आली आहे. नक्षलींनी अतिदुर्गम भागात हत्या, मारझोड करीत असल्याने पुन्हा नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत