Top News

दाम्पत्यावर वाघाचा हल्ला #tiger #tigerattack #chandrapur #chimur

पत्नी ठार तर पती बेपत्ता.
चिमूर:- तेंदू संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे तर पती अद्यापही बेपत्ता आहे. मीना जांभुळकर असे मृतक महिलेचे नाव आहे. व विकास जांभुळकर तिच्या नवऱ्याचे आहे. ही घटना चिमुर तालुका येथे घडली.

विद्या परीषदेची दि. २३ मे २०२२ ला तातडीची आभासी (online) सभा....
सध्या तेंदू हंगाम सुरु असल्याने जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभुळकर आणि त्यांचा पत्नी मीना तेंदू संकलनासाठी जंगलात गेले होते. यावेळी त्यांच्यावर अचानक वाघाने हल्ला चढविला. या हल्यात मीना जांभुळकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विकास जांभुळकर अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध घेत आहे.
तेंदूपत्ता संकलनासाठी पतीसह जंगलात गेलेल्या चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या केवाडा येथील मीना विकास जांभुळकर ( वय ५५ वर्ष ) हिचा मंगळवारी (24 मे) रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर पती विकास जांभुळकर ( वय 60 ) बेपत्ता होता. पोलीस . गावकरी व वनविभागाची चमू बेपत्ता विकास जांभुळकर यांचा शोध घेत होते. अखेर आज बुधवारला विकास जांभुळकर हे दत्त मंदिराजवळ जखमी अवस्थेत सापडले. त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने