Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

गोंडवाना विद्यापीठाने परीक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयांच विद्यार्थ्यांने केले स्वागत..... #Gondwanauniversity #Chandrapur #gadchiroli

चंद्रपूर/ गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा अखेर ऑफलाइन MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या दि. ०१ जून २०२२ पासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा या परीपत्रकाद्वारे स्थगित करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात येत असून अशा सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दि. १० जून २०२२ पासुन सुरु होईल. या परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात येणार असून संपूर्ण वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उलपब्ध करून देण्यात येणार आहे.
निर्णयाच विद्यार्थ्यांने केले स्वागत.....

गोंडवाना विद्यापीठाने परीक्षा संदर्भात आज निर्णय घेतला. विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या दि. ०१ जून २०२२ पासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा या परीपत्रकाद्वारे स्थगित करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात येत असून अशा सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दि. १० जून २०२२ पासुन सुरु होईल. या परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे परीपत्रक काढण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाचे विद्यार्थ्यांने केले स्वागत केले आहे.
ऑफलाईन एमसीक्यु पद्धतीने परीक्षा घेण्याचा विद्यार्थ्यांचा होता आग्रह....

गोंडवाना विद्यापीठाने कोरोनानंतर महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने आगामी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, निम्म्याहून अधिक सत्रे ऑनलाइन शिकविल्यानंतर आता परीक्षा ऑफलाइन का घेतली जात आहे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. गोंडवाना विद्यापीठाने विश्लेषनात्मक परीक्षेचा निर्णय मागे घ्यावा आणि ऑफलाईन एमसीक्यु आधारित परीक्षा घ्यावी. असा विद्यार्थ्यांचा आग्रह केला होता.


गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या परीक्षा दिनांक १/६/२०२२ पासून विश्लेषनात्मक पध्दतीने घेण्यात येणार असून परीक्षेचे वेळापत्रक सुध्दा घोषीत करण्यात आले. मात्र विद्यार्थी संघटनेचे याचा विरोध दर्शवित कुलगुरूंना निवेदन दिले. त्यामुळे कुलगुरु महोदयांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची तातडीची सभा दिनांक २३ मे, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता आभासी पध्दतीने आयोजीत करण्यात आलेली होती. या सभेत परीक्षा नेमकी कशापध्दतीने घेण्यात येणार या बद्दल चर्चा होणार असल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.
विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या दि. ०१ जून २०२२ पासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा या परीपत्रकाद्वारे स्थगित करून विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दि. १० जून २०२२ पासुन घेण्यात येणार आहे. या परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात येणार असल्याचा निर्णय गोंडवाना विद्यापीठाने घेतला. आज या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो....
चेतन दिवसे विद्यार्थी
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

गोंडवाना विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा 2022 संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेत आज परिपत्रक जाहिर केले.परीक्षा ह्या ऑफलाइन mcq पद्धतीनेच होईल हा निर्णय घेतला.या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
आकाश वानखेडे,
एम.बी.ए, प्रथम वर्ष विद्यार्थी,
रेनाइस्सान्स इंस्टिट्यूट ऑफ़ मैनेजमेंट स्टडीज,चंद्रपुर.
ऑफलाइन mcq परीक्षा संदर्भात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर तर्फे सतत प्रयत्न सुरु होते. आज गोंडवाना विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा-2022 संबंधित अंतिम निर्णय जाहिर केला. उशिरा का असेना पण आज निर्णय घेऊन सर्व विद्यार्थी वर्गाला सुखद केले. यासाठी विद्यापीठाचे, संपुर्ण महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गातर्फे आभार मानते.
प्रांजली चंद्रकांत वैद्य
विद्यार्थीनी इ. एन. टी. सी अंतिम वर्ष,
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर

 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी विध्यार्थीच्या मागणी वरून MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले उशिरा का होईना योग्य निर्णय घेतले त्याबद्दल विद्याठाच्या निर्णयाचे आम्ही सर्व विध्यार्थी स्वागत करतो.

अजय मधुकर मस्के
(MSW final year (Fourth sem )
अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वडसा (देसाईगंज)

 

बहुप्रतिक्षित गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी-२०२२ च्या परीक्षा ह्या ऑफलाइन बहुपर्यायी (mcq pattern) पद्धतीनेच होईल असे आज विद्यापीठाने जाहिर केले. गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याने सर्वत्र विद्यार्थी वर्गाकडून स्वागत होत आहे. ह्या निर्णयामुळे नक्कीच विद्यार्थी वर्ग समाधानी असेल अशी अपेक्षा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे मनस्वी आभार.
शुभम निंबाळकर,
विश्वस्त (नागपुर विभाग) संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.
सदस्य, यंग थिंकर्स चंद्रपुर
गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या उन्हाळी -२०२२ च्या लेखी परीक्षा दि. ०१/०६/२०२२ पासून विश्लेषनात्मक पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले मात्र या निर्णयाचा विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला. तसेच निवेदन सुध्दा देण्यात आले. दि २३ मे ला विद्या परीषदेनी तातडीची आभासी (online) सभा घेतली. त्या सभेत ऑफलाईन MCQ परीक्षाचा निर्णय घेतला. विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचे मनःपूर्वक धन्यवाद...
अविनाश विजय चोले अध्यक्ष
संजिवनी फाउंडेशन चंद्रपूर महानगर
गोंडवाना विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाचा स्वागत करतो. उन्हाळी- 2022 ही परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांची होती. विद्यार्थ्यांची मागणीला घेऊन अभाविप तर्फे विद्यापीठावर मोर्चा काढून कुलगुरूंना निवेदन देण्यात आले होते. अभाविप च्या निवेदनाला यश आले. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रविण गिरडकर (अभाविप जिल्हा संयोजक)
विद्यापीठाच्या आजच्या निर्णयाचा स्वागत करतो. आम्ही अनेक विद्यालयात जाऊन मत जाणून घेतले आमच्या डोळ्याचा समोर असे मत आले की उन्हाळी-२०२२ विद्यापीठाच्या परीक्षा MCQ पद्धतीने घेण्यात यावे या संदर्भात अभाविप तर्फे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले या निवेदनाला आज यश प्राप्त झाले.
श्रुती कान्हेकर भाग संयोजक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत