💻

💻

वेळवा-सेल्लूर जंगलाला भिषण आग #fire #firenews


प्लॅंटस्टेशनमधील झाडे जळून खाक
पोंभूर्णा :- पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा सेल्लुर या गावाशेजारी असलेल्या जंगलाला आज सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान भिषण आग लागल्याने शेकडो हेक्टर जंगल जळुन खाक झाले आहे. सोबतच जंगला नजिक असलेल्या शेतातील तणसीचे ढिगारे ही जळून खाक झाली आहेत. 

चंद्रपूर-मूल महामार्गावर भीषण अपघात
पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या दिघोरी बिटातील वेळवा सेल्लुर गावाला लागुन असलेल्या कक्ष क्रमांक ५५१ मधील जंगल व तिथे असलेल्या प्लॅंट स्टेशनला आग लागली. आग एवढी भिषण होती की काही वेळातच शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले.

कळमना जवळील बांबू डेपोला भीषण आग…. 

 वारा सुसाट्याचा असल्याने जंगला नजीक असलेल्या शेतातही आग पसरली. शेतातील काही तणसीचे ढिगारे जळली असल्याची माहिती आहे. या परिसरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य असुन याच परिसरात वाघाचेही वास्तव्य होते. आगीला वेळीच आटोक्यात आणली गेली नाही तर वेळवा व सेल्लुर या गावांना धोका निर्माण होऊ शकतो यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. नेमकी आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनविभागाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. 

चंद्रपूर शहरातील YOUBE ला लागली आग....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत