Top News

नक्षल्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या #murder


गोळ्या घालून मृतदेह रस्त्यावर फेकला
एटापल्ली:- गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील डोद्दूर गावचे पोलीस पाटील कुल्ले वंजा कोवासी यांची नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात FAKE परीपत्रक सोशल मीडियावर व्हायरल.....
दरम्यान, नक्षलवाद्यांनी भामरागड व एटापल्ली या दोन तालुक्यांत धुमाकूळ घातला असून काही दिवसांपूर्वीच रस्त्यांच्या कामावरील वाहने जाळून दहशत निर्माण केली होती.

गडचिरोलीत खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या
सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नक्षलवादी मौजा डोद्दूर येथील गाव पाटील कुल्ले वंजा कोवासी हे डोद्दूर पत्ता फडीवर असतांना 40 ते 50 नक्षलवादी तिथे आले. नक्षलवादी जबरदस्तीने पोलीसपाटलांना घेऊन गेले. त्यानंतर कोवासी यांना बेदम मारहाण करण्यात आली. डोद्दूर ते वटेली कच्च्या रस्त्यावर नेऊन कुल्ले कोवासी यांची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर कोवासी यांचा मृतदेह रस्त्यावर आणून ठेवला.

पोलिसांचा खबरी समजून नक्षलवाद्यांनी केली दोघांची हत्या 

पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदर माहिती त्यांचा मुलगा किशोर कुल्ले कोवासी व पंधरा ते वीस सहकाऱ्यांनी पोलीस मदत केंद्रात येऊन दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा परिसरात दहशत व भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने