जाहिरात... Advertisement... विज्ञापन

रानडुकराच्या शिकार प्रकरणी चौघे अटकेत #चचarrested

पोंभूर्णा :- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणार्‍या भुजला नवेगाव वन नियत क्षेत्रात कुत्र्याच्या सहाय्याने रानडुक्कराची शिकार केल्या प्रकरणी वनविभागाने चौघांना अटक केली आहे. रविंद्र शेंडे, रामदास शेंडे, गणेश गेडाम, अमोल शेंडे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या सगनापूर येथील चारही आरोपी रहवासी आहेत. घोसरी वनक्षेत्रातील भुजला नवेगाव वन नियत क्षेत्रात गस्तीवर असलेल्या क्षेत्र सहाय्यक अजय बोधे, वनरक्षक विनायक कस्तुरे व वनकर्मचाऱ्यांना भुजला नवेगाव जंगलात कुत्र्याच्या सहाय्याने रानडुक्कराची शिकार करतानाची गुप्त माहिती प्राप्त झाली माहितीच्या आधारे घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने शिकार करताना चार आरोपींना पकडण्यात आले.
सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक अजय बोधे, वनरक्षक विनायक कस्तुरे व चमूने केली असून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत