Top News

भाजपा महानगरने पाळला काळा दिवस #Blackdays

आणिबाणी म्हणजे लोकशाहीची हत्या:- डॉ.मंगेश गुलवाडे
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भाजपा चंद्रपूर महानगरच्या वतीने येथील गांधी चौक परिसरात महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 25 जून हा काळा दिवस म्हणून पाळला गेला. याच दिवशी म्हणजेच 25 जून 1975 ला देशात आणिबाणी लागू करण्यात आली होती. यावेळी भाजपा महानगरतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी, सत्तेसाठी भारतीय लोकशाहीची हत्या करून असंख्य निरपराध लोकांना अटक करण्यात आली व संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण करण्यात आली. त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच आणिबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या वीरांना अभिवादन करतो असे, सांगितले.
या कार्यक्रमात भाजपा महानगर संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री रवींद्र गुरनुले, माजी उपमहापौर राहुल पावडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर, महामंत्री शिला चव्हाण, प्रज्ञा बोरगमवार, महानगर उपाध्यक्ष अरुण तीखे, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, रवी लोणकर, विठ्ठल डुकरे, रवी आसवाणी आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने