वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घाला:- डॉ. मंगेश गुलवाडे

Bhairav Diwase

भाजप शिष्टमंडळाचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या नावे असलेले निवेदन सादर करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांच्या सोबत चर्चा करून चंद्रपुरातील वाढते घरफोडीचे प्रकरण,हाणामारी तसेच अवैध व्यवसाय यांच्यावर अंकुश लावण्यासाठी महानगरात विविध भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी व गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यात यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
सदर निवेदन सादर करतांना भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टवार,रवींद्र गुरनुले,महानगर सचिव रामकुमार आक्कपेल्लीवार,राकेश बोमनवार, सूर्या खजांची,अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,दिनकर सोमलकर,उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष रुद्रनारायन तिवारी,प्रलय सरकार, भारतीय जनता युवा मोर्चा सचिव सतीश तायडे,महेश कोलावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती