जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोंभूर्ण्यात महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न #chandrapur #pombhurna

पोंभूर्णा :- तालुक्यात महिला काँग्रेसचे संगठन मजबूत करण्यासाठी व महिला काँग्रेसची कार्यपद्धती गावा गावात पोहचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामिणच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पोंभूर्णा येथे महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली.
महिलाशक्ती विकासाचे प्रमुख केंद्रबिंदू आहे.राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी शहरी भागातील महिलांसह ग्रामीण महिलांना संधी देऊन महिला काँग्रेसचे संगठन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संगठन वाढीसाठी सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी तालूका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष कवडू कुंदावार यांच्या हस्ते नवनियुक्त जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुनीता भुरसे,आशा मानकर, चेक फुटाणा सरपंच जयश्री अर्जुनकर,घोसरी सरपंच रोषणी लोडे,देवाडा बुद्रुक सरपंच माधुरी चुधरी, थेरगाव सरपंच संगीता गणवीर, बबीता गेडाम,किरण गुरूनुले,अंतकला पोरटे, कांग्रेस कमेटीचे प्रशांत झाडे,ईश्वर पिंपळकर,रुषी पोल्लेलवार,विनायक बुरांडे,नंदू कुंभरे, जयपाल गेडाम यांची उपस्थिती होती.
आढावा बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत