Top News

चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील #chandrapur


चंद्रपूर:- शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन भविष्यात अपेक्षित असल्याचा मोठा गौप्यस्फोट किशोर जोरगेवार यांनी केला होता. चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपक्ष आमदार आणि फुटीर शिवसेना यांच्यात वेगळा गट निर्मितीचे सध्या प्रयत्न होत आहेत. शिंदे गटाने मागितलेल्या प्रस्तावावर आ. किशोर जोरगेवार त्यांचे निकटवर्तीय आणि चंद्रपूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार घेतला असून चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने