Top News

आरो फिल्टरच्या वेस्ट पाण्यामुळे बाजार चौकात दुर्गंधी!


राजुरा:- आरो फिल्टरच्या वेस्ट पाण्यामुळे  ग्रामपंचायत समोर दुर्गंधी पसरली आहे. बाजारात बसणाऱ्या गुजरी व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
 राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विरूर स्टेशन येथील बाजारपेठ ही तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ को-ऑपरेटिव्ह, पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेल्वे स्थानक, विद्युत कार्यालय, तलाठी कार्यालय,  शाळा व महाविद्यालय असून परिसरातील धानोरा, कविठपेट, चिंचोली, अंतरगाव, अन्नूर, सुब्बई, मुंडीगेट, बापूनगर, थोमापूर, डोंगरगाव, चिंचाळा, केळकर, नवेगाव, भेंडाळा, सिरर्शी, बेरडी, चिंचबोडी, सिंदी, नलफडी व आधी गावातील नागरिक विरूर येथे खरेदी-विक्री व शासकीय कामानिमित्य बाजारपेठेत येतात. बाजारपेठ परिसरात आरो प्लांटच्या अतिरिक्त पाण्यामुळे बाजारपेठेत दुकान लावून बसणाऱ्या व्यापाऱ्यांना व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकाम करून पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी विरूर येथील बाजारपेठेत बसणारे व्यापारी  माजी सरपंच भास्कर सिडाम, गजानन कोडगी लवार, राकेश रामटेके, विनोद बोधे, योगेश बक्षी, दिलीप तुराकर, अरुण औवागण सह गावातील नागरिकांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने