जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जागतिक योग दिनानिमित्त योगा प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न #chandrapur

सरदार पटेल महाविद्यालयाचे आयोजन
चंद्रपूर:- सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील शांताराम पोटदुखे सभागृहात दि. 21 जुन ला 21 MAH/BN/NCC/WARDHA, 3 GRIL/MAH/BN/NCC/NAGPUR, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक योग दिनानिमित्त योगा प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाला. कैलास घुमडे यांनी योगाचे महत्त्व सांगून कुणाल कायकर, रितेश चौधरी, कुणाल चहारे यांच्या सोबत प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना विविध आसनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कॅप्टन सतिश कन्नाके एन.सी.‌सी. प्रमुख, डॉ. कुलदीप गोंड एन.एस.एस. समन्वयक चंद्रपूर, डॉ. विजय सोमकुंवर शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रशिक्षक कैलास घुमडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते. असं मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.‌ प्रमोद काटकर बोलताना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार 21 जूनला हा दिवस साजरा केला जातो. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात येते अशी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
यामध्ये सहभागींनी उभ्या, बठ्या आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले. मानव जातीच्या कल्याणासाठी ॠषीमुनींनी प्राणायमांचा आविष्कार केला. ताण तणांवाचे प्राणायमाच्या माध्यमातून व्यवस्थापण करता येते. ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य, उद्देश जाणून घेता येतो, अशी शिकवण यावेळी देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत