वीज कोसळून आई व 2 मुलींचा मृत्यू #death

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपुरात वीज कोसळून आई व 2 मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या वरवट या गावातील रामटेके परिवारातील घटना आहे.
या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची नावं संगीता रामटेके (40), रागिणी रामटेके (17) व प्राजक्ता रामटेके (14) असे आहे.
दुपारच्या सुमारास आईसह दोन्ही मुली घरासमोरील अंगणात बसून असताना वीज कोसळल्याने यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र, त्यांच्या मृत्युविषयी अजूनही सस्पेन्स कायम असून वीज कोसळल्याने किंवा विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तिघांच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.