जाहिरात... Advertisement... विज्ञापन

राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य दीपस्तंभागत मार्गदर्शक:- आ.सुधीर मुनगंटीवार #chandrapur


भाजपा महिला आघाडीतर्फे राणी लक्ष्मीबाई यांना आदरांजली
चंद्रपूर:- ‘चमक उठी सन सत्ताफवन में वह तलवार पुरानी थी, खुब लढी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी’. ब्रिटिशांच्या विरोधात झुंज देताना राणी लक्ष्मीबाईने 'मेरी झांसी नही दुंगी' असे स्फुर्तीदायक उद्गार काढले.
त्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना जेरीस आणले. शेवटच्या श्वासापर्यंत त्या आपले झांशी संस्थान स्वतंत्र करण्यासाठी लढल्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या जनतेसाठी लढल्या. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. लक्ष्मीबाई युद्धकलेत, घोडेस्वारी, मलखांब, तलवारबाजी मध्ये निपुण होत्या. जगभरातील क्रांतीकारांना सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला तसेच सेनेला याच झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने, जिद्दीने स्फूर्ती दिली. हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ति देत झांशीच्या राणी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या. त्यांचे शौर्य आपल्यासाठी दीपस्तंभागत मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना माजी महापौर तथा भाजपा महिला आघाडी महानगर जिल्हाकध्यीक्षा सौ. अंजली घोटेकर म्हाणाल्याी की, मातृभूमीच्याा स्वा्तंत्र्याच्याा रक्षणासाठी आपल्यास प्राणांचे बलिदान देणारी साहस व पराक्रमाची अप्रतिम शौर्याची प्रतिमुर्ती म्ह‍णजे राणी लक्ष्मी बाई होय. त्यांवचे शौर्य, जिद्द, देशभक्ति, साहस ही आमच्यारसाठी प्रेरणा असून त्यां चे विविध गुण अंगीकारणे हीच त्यांरना खरी आदरांजली आहे. यावेळी भाजपा महिला आघाडी चंद्रपुर महानगर जिल्हा शाखेतर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्याक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आणि माजी महापौर तथा भाजपा महिला आघाडीच्या महानगर जिल्हाध्यक्ष सौ अंजली घोटेकर यांच्याा नेतृत्वा त राणी लक्ष्मीाबाई यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सौ. रेणुताई घोडेस्वा‍र, सौ. प्रभा गुडधे, सौ. लिलावती रविदास, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. वंदना संतोषावर कु. मोनिषा महातव, सौ. वंदना जांभुळकर, सौ. रमिता यादव, सौ. वर्षा सोमलकर, काजल खोटे, सरिता सोयाम, संजीता तामगाडगे आणि अन्यं महिला कार्यकत्यांनीची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत