Top News

मॅजिक बस चंद्रपूर आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चंद्रपूर तालुक्यात विविध गावात प्रवेश दिवस साजरा #chandrapur

चंद्रपूर:- मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वय अरुण मोहिते यांच्या नेतृत्वात चंद्रपूर तालुक्यातील चीचपल्ली, लोहारा, बोर्डा , चेकनिंबाडा, अजयपुर, पिंपडखुट, गोंडसावरी, नागाडा , या गावात शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.


विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहे. चंद्रपूर तालुक्यातील केंद्र चीचपल्ली येथे 29 जून 2022 ला मॅजिक बस आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा पहिला दिवस असल्याने गावागावात रॅली,मान्यवरांचे मार्गर्शन, शिक्षणाविषयी जनजागृती, शाळेत नवीन दाखल झालेल्या मुलांचे स्वागत, त्यात विद्यार्थ्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक ,भावनात्मक, भाषा विकास , ओडखणे असे अनेक कार्यक्रम घेऊन हा शाळेचा पहिला दिवस शाळा पूर्व मेळावा म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला
मुख्याध्यापक , सर्व शिक्षक वृंद , गावकरी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मॅजिक बस चे समुदाय समन्वयक मीनल दोडके, प्राजक्ता दुर्योधन , अश्विनी गौरकार , सुलभा जुमनाके, राणी कावळे, माधवी पिल्लरवार आणि शाळा सहाय्यक अधिकारी कु. नालंदा बोथले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने