ग्रामिण रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे दोन दिवसाच्या चिमुकल्याचा मृत्यू #death #gondpipari

कोसरे कुटुंबीयांचा आरोप; पोलीसात तक्रार दाखल
गोंडपिपरी:- ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी भाग्यश्री बंटी कोसरे (२९) यांना कुटुंबीयांनी गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात दि. २ जून गुरुवारी सायंकाळी ४ वाजता दाखल करण्यात आले. भाग्यश्री यांनी रात्री ९ वाजता गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्याचे वजन देखील ठीक होते अचानक ताप आला, त्याच्यावर योग्य उपचार न केल्याने उपचार करण्यासाठी हलगर्जीपणा डॉक्टरांनी केल्यामुळे दि. ४ जुन शनिवारी सकाळी बाळाला जीव गमवावा लागला असा आरोप करत कोसरे कुटुंबीयांनी गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दवाखान्यात प्रसूती च्या ठिकाणी कुलर बंद अवस्थेत होता. सोबतच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी किती प्रमाणात द्यायचे हे देखील सांगितले नाही. बाळाला औषध देताना कोणतीही नर्स त्या ठिकाणी न्हवते. ताप वाढत असताना वारंवार डॉक्टरांना बोलावून डॉक्टर येत न्हवते एकंदरीत गोंडपिपरितील ग्रामिण रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे दोन दिवसाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गोंडपीपरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पीएसआय पटले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्थरावरून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या