ऋषितुल्य व्यक्तीमत्व हरपले:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. डॉक्टरी पेशात असलेल्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी रुग्णसेवा केली. सोबतच सामाजिक प्रश्नांवरही त्यांचे विचार हे दखलपात्र असायचे. प्रसिद्धी पासून दुर राहत त्यांनी समाजासाठी केलेले कार्य हे आजिवन स्मरणात राहणार आहे. ते अनेकांचे मार्गदर्शक होते. अनेक समाजिक, राजकीय कार्यकर्ते त्यांचा आर्शिवाद घेऊन मोठे झाले. त्यांच्या जाण्याने ऋषितुल्य व्यक्तिमहत्व कायमचे हरपले आहे. अशी शोकसंवेदना डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या निधनानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
साधी राहणीमान आणि स्पष्ट बोलण्याचा त्यांच्या स्वभावामुळे ते नेहमी स्मरणात राहणार आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार होते. त्यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक म्हणुनही काम पाहिले होते. त्यांनी त्यावेळी संघाचा विस्तार चंद्रपूरात केला. अनेकदा त्यांची भेट होत असे. समाजहिता प्रति त्यांच्यात असलेली तळमळ त्यांच्या बोलण्यातुन नेहमी जाणवायची. ते स्वत:च रुग्णालय चालवत असतांना अगदी नाममात्र फी घेत एक प्रकारे रुग्णांची सेवा करायचे. त्यांच्या जाण्याने समाजाचेही मोठे नुकसाण झाले आहे. त्यांच्या जाण्याने कसलाही गर्व न बाळगळता वेगवेगळ्या माध्यमातुन समाजाची सेवा करणा-या व्यक्तीमहत्वास आज समाज मुकला असल्याचे त्यांनी सदर शोकसंदेशातुन म्हटले आहे.