जाहिरात... Advertisement... विज्ञापन

तुकुम प्रभाग क्र १ येथे आरोग्य मित्र हेल्थ कार्ड चे मोफत वितरण शिबीर संपन्न #chandrapur


चंद्रपूर:- आरोग्य धनसंपदा हि उक्ती आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत परंतु आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे हे कोरोनाच्या काळात आपण शिकलो अशा परिस्थिती मध्ये जनतेने आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे हे पटवून देण्यासाठी लोकनेते विकासपुरुष सुधीर भाऊ च्या आदेशाने तुकुम प्रभागातील लोकप्रिय माजी नगरसेवक इंजि. सुभाष कासनगोट्टुवार यांच्या सौजन्याने प्रभागातील जनतेला शहरातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील नामांकित खाजगी दवाखाना, सोनोग्राफी,पॅथॉलॉजि, औषधी, मध्ये सवलतीच्या दरात उपचार करून घेता यावा या उदात्त हेतूने प्रभागातील माजी नगरसेवक इंजि.सुभाष कासनगोट्टुवार व मित्र मंडळ यांनी स्वखर्चाने मोफत आरोग्य मित्र हेल्थ कार्ड वितरित केले या शिबिरात शेकडो च्या संख्येने नागरिकांनी आरोग्य मित्र हेल्थ कार्ड बनवुन घेतले.
या प्रसंगी प्रभातील अमीन शेख ,मजुश्री कासनगोटटूवार ,वसंतराव धनधरें पाटील, सुरेशराव बेलखेडे, आरूनराव दंतूलवार,श्री दामोधर अवघडे ,सुदीप दूपारे, रमेशराव ददगाल, ह.भ.प.निर्मलाताई लेनगुरे, सौ मालतीताई लांडे , सौ निर्मलाताई लोणकर,सौ सुनंदा राठोड ,सौ सिंधुताई चौधरि ,उषाताई मेश्राम, सौ शशिकला इटँकर,सुमन पप्पलवार,सौ रजनी शेंद्रे, सईदा शेख, सौ सुषमा नक्षीने , उपस्थित होते. परिवार विकास फाउंडेशन तर्फे संचालक हेमंत त्रिवेदी, शुभम शुक्ला, श्याम शुक्ला, महेश भंडारे व वार्डातील समस्त नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत