Top News

हे काय सांगाता.....! चक्क ग्रामपंचायत कार्यालयात जाणाऱ्या रस्ताची दुरवस्था #korpana



गावकऱ्यांचा संताप; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष?
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत इरई येथील गावकरी आजही ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी रस्त्याची दुरवस्था झाली असून, कार्यालयात ये-जा करण्यासाठी नागरिक पायदळ, तर पावसाळ्यात चिखल तुडवत जात असतात.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुद्धा इरई-भारोसा रोड अद्यापही पूर्ण झाला नाही. कित्येकदा हा रोड मंजूर झाला. अनेकदा रोडसाठी लागणारे साहित्य गिट्टी पण रोडला टाकली. परंतु टाकलेली गिट्टी सुद्धा उचलून नेण्यात आल्याची माहिती मिळाली. पण मंजूर झालेला रोड कुठे जातो? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. टाकलेला मटेरियल का बरं उचलून नेतो हे कुणालाच अजून पर्यंत माहीत नाही. इरई येथे वर्ग 4 थी पर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी भारोसा किंवा भोयगाव ला जावे लागते ते पण पण पावसाळ्यात चिखल तुडवत... लवकरच पावसाळ्यातला सुरूवात होणार..... रस्त्याची दुरवस्था अशीच असली कि अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. पावसाळ्यात लहान मुलांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे? असा सवाल संतप्त गावकऱ्यांना पडला आहे. प्रशासनाने या जातीने लक्ष घालावे. अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत
भारोसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भारोसा-इरई रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. इरई गावातील नागरिकांना कामानिमित्त बाहेर जायचे असल्यास त्या खडतर रस्त्याने प्रवास करावा लागतो. या प्रवासात अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच इरई येथील विद्यार्थी भारोसा, भोयेगाव तसेच चंद्रपूर ला शिकण्यासाठी जात असतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठून असते. प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची पहाणी करून रस्ता दुरुस्त करून द्यावी. अशी मागणी करतो.
देवराव निमकार सरपंच 
गट ग्रामपंचायत भारोसा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने