Top News

हैद्राबाद येथे मजुरी साठी गेलेल्या पोंभूर्णा येथील दोन युवकांचा मृत्यू #death


पोंभूर्णा :- हेद्राबाद (तेलंगणा राज्य) येथे उदरनिर्वाहासाठी मजुरी करण्यासाठी गेलेल्या पोंभूर्णा येथील दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ जून ला घडली.
काही महिन्यापुर्वी उदरनिर्वाहासाठी तेलंगणातील हैदराबाद येथे कामासाठी गेलेल्या दोन युवकांवर काळानी झडप घातली. तेथील शेततळ्यात शौचास गेले असता पाय घसरून हिवराज मनोहर जिल्हेवार (वय २७ वर्ष) खड्ड्यात पडला असता हिवराज ला वाचविण्याच्या प्रयत्नात विनायक ईप्पलवार (वय ३४ वर्ष) हा ही खड्ड्यात पडला. यात दोघांचा मृत्यू झाला.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करून पोंभुर्णा येथे आणण्यात येणार आहे.
घटनेचा पुढिल तपास हेद्राबाद पोलिस करीत आहेत. सदर दुर्दैवी घटनेमुळे दोघांच्याही परिवारात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने