पोंभूर्णा :- पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील महात्मा ज्योतिबा फुले आर्ट ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून शाळेचा ९६.४९ टक्के निकाल लागला आहे.
या निकालात विद्यार्थ्यींनीने बाजी मारली असून ८०.६७ टक्के घेऊन काजल राळेगावकर हि शाळेतून प्रथम आली असून तीने पोंभूर्णा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर याच शाळेतील रिया देशमुख हि ८०.१७ टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे.तर वैष्णव देऊरघरे हा ७९.१७ टक्के गुण घेऊन तिसरा आला आहे.घाटकुळ येथील तीघेही विद्यार्थी तालुक्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक घेऊन नावलौकिक केले आहे.
जनता कनिष्ठ महाविद्यालय पोंभूर्णा शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून परिक्षेत बसलेले ११३ विद्यार्थ्यांपैकी ११३ हि विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतील पुजा खेलचंद बुरांडे हि ६९.५० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे.
चिंतामणी ज्युनिअर सायन्स कॉलेज पोंभूर्णा शाळेचा ९८.७५ टक्के निकाल लागला असून ६३.१७ टक्के गुण घेऊन प्राजक्ता कोमलभाऊ दुर्गे शाळेतून प्रथम आली आहे.
राष्ट्रमाता महाविद्यालय देवाडा खुर्द शाळेचा ९०.४० टक्के निकाल लागला आहे.