कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भद्रावतीचे 10 कराटेपटू सहभागी होणार #bhadrawati

Bhairav Diwase
भद्रावती:- येत्या ३० व३१ जुलैला कोलकाता येथील आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भद्रावती शहरातील 10 कराटेपटू सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य कराटे प्रशिक्षक तथा आल इंडिया सेशिनकाई कराटे फेडरेशनचे कार्यकारी सदस्य के.श्रिनीवास यांनी दिली आहे.
ही बाब भद्रावती शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आल इंडिया सेशिनकाई कराटे फेडरेशन व्दारा कोलकाता येथे ३० व ३१ जुलैला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतासह एकुन आठ देशातील कराटे स्पर्धक भाग घेत आहेत. या स्पर्धेत शहरातील हर्शीता वंजारी, प्राजक्ता ताकसांडे,आरुशी गेडाम,हिरल दशारकर, तन्वी पवरा, साई तेजा पुलहारी, जय शेंडे, राजदर्शन पवरा,राधे शिडामे हे कराटेपटू भाग घेत आहेत. या टिमचे प्रशिक्षक के.श्रीनिवास असुन सहाय्यक प्रशिक्षक विनोद सोनारकर, सुमग तालुकर व जी.वेंकटराव हे आहेत.