Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

विद्यापीठाच्या सीनेट (SENATE) निवडणुकीसाठी अभाविप पॅनल च्या यश बांगडे यांनी सादर केला अर्ज #chandrapur


चंद्रपूर:- आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष यश बांगडे यांनी अभाविप पॅनल मधून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अधिसभा (SENATE) निवडणुकीसाठी अर्ज सादर केला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पॅनल च्या सर्व उमेदवारांनी आज (दि. 29) रोजी उमेदवारी अर्ज गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली निवडणूक विभाग येथे सादर केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पॅनलचे खुल्या प्रवर्गाचे उमेदवार यश बांगडे, प्रशांत दोंतुलवर, डॉ. सागर वझे, मनोज भूपाल, स्वरूप तार्गे आणि राखीव प्रवर्गाचे उमेदवार जयंत गौरकार, योगिता पेंदाम, गुरुदास कामडी, किरण गजपुरे, धर्मेंद्र मुनघाटे यांनी अर्ज सादर केला.
त्यावेळी भाजपा चंद्रपूर महानगर संगठन महामंत्री राजेंद्र गांधी, ग्रामीण संगठन महामंत्री संजय गजपुरे, अभाविप विदर्भ प्रांत अध्यक्ष योगेश येनारकर, विजय सराफ, दिवाकर पुद्दटवार, संदीप लांजेवार, श्रीकांत कुमरे, धनराज डबले, स्नेहित लांजेवार, कुणाल गुंडावार, अक्षय मंगरुळकर, शुभम दयालवर, चेतन कोलते, अंकुश कुणघाडकर,अभिजित दांडेकर व इतर उपस्थित होते.
अभाविप च्या संपूर्ण पॅनल ला आपण २१ ऑगस्ट, २०२२ होणाऱ्या मतदानाला जाऊन आपण सर्व नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी आपले मतरुपी आशीर्वाद द्यावा ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत