🌄 💻

💻

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम #chandrapur


राहुल पावडे मित्रपरिवाराचा पुढाकार

भव्य मॅरेथॉन सुद्धा घेण्यात येणार

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर:- राज्याचे माजी अर्थ व नियोजनमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३० जुलैला राहुल पावडे मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रघुनंदनवन येथे कार्यक्रम होणार आहेत.
लर्निंग लायसन बनविणे, श्रमिक कार्ड बनविणे, आधार अपडेट करणे तसेच भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. विदर्भ हाऊसिंग चौक येथून महात्मा फुले चौक ते महसूल पुलिया सद्गुरु मेडिकल ते विदर्भ हाऊसिंग चौकपर्यंत या मॅरेथॉनचे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खेळाडूंनी जास्त जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल पावडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. विविध स्पर्धेत विजयी ठरलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात येईल. तसेच वैयक्तिक बक्षीसेसुद्धा देण्यात येणार आहे. स्पर्धकांची नोंद अमित गौरकार, संपर्क 9834392506 रोशन भुजाडे, राकेश सर यांच्याकडे करावी, असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत