Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

देशसेवेसाठी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी व युवकांनी सहभाग घ्यावा:- जिल्हाध्यक्ष भाजयुमो विशाल निंबाळकर #chandrapur


30 जुलैला महानगर भाजपा तर्फे सेवा सप्ताह आणि भव्य रक्तदान शिबिर

माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे माजी अर्थमंत्री,विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे(30 जुलै)औचित्य साधून महानगरातील 5 मंडळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात रक्तदान करून लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रति असलेल्या प्रेमाला कृतीची जोड द्यावी असे आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,ज्येष्ठ नेते प्रमोद कडू,महासचिव सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,माजी महापौर राखी कंचर्लावार,माजी उपमहापौर राहुल पावडे,माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, महिला मोर्चा अध्यक्षा अंजलीताई घोटेकर,भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले आहे.
महानगरातील पूर्व,पश्चिम,उत्तर ,दक्षिण व मध्य मंडळात हे शिबीर आयोजित असून हनुमान मंदिर इंदिरा नगर,डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जटपूरा गेट,मातोश्री विद्यालय तुकुम,संत रविदास सभागृह बाबूपेठ व गिरनार चौक येथे हे शिबीर स.10 ते दु 3 वाजता दरम्यान संपन्न होणार आहे.शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,मंडळ प्रमुख रवी लोणकर,विठ्ठलराव डुकरे,सचिन कोतपल्लीवर,भारती दुधानी,संदीप आगलावे,छबु वैरागडे व इतर परिश्रम घेत आहेत.
चला रक्तदान करू, समाजाचे ऋण फेडू...असे घोषवाक्य या शिबिराकरिता देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत