Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दुदैवी....! दोन शेतकऱ्यांचा मृत्यू #chandrapur #death #gondpipari #mul


विज पडून एक ठार तर रानडुक्कराचा हल्यात दूसरा ठार
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. रानडुक्करांचा हल्यात गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर मुल तालुक्यातील दहेगाव येथिल शेतकऱ्याचा विज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. या दुदैवी घटनांनी जिल्हा हळहळला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी येथिल शेतकरी अविनाश भगवान निखाडे (वय 48) हे नेहमी प्रमाणे आज शेताकडे निघाले होते. मात्र मार्गात रानडुकरांचा कळपाने अविनाश यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झालेत. जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
मुल तालुक्यातील दहेगाव येथिल शेतकरी विलास रामुजी आलाम यांच्या शेतात धान रोवणी सूरू होती. धान रोवणी सूरू असतांना अचानक विज कोसळली. यात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कुटूंबातील कर्ता पुरूष हरविल्याने कुटूंब पोरके झाले आहे. या दोन घटनेने जिल्हा हळहळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत