५ जणांचे प्राण वाचविणाऱ्या सैनिक निखिल काळे यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार #bhadrawati

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील पानवडाळा गावचे रहिवासी आणि सध्या लडाख येथे कर्तव्यावर असलेले सैनिक निखिल सुधाकर काळे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा तालुका कोषाध्यक्ष रुपचंद धारणे यांच्या हस्ते निखिल काळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका सरचिटणीस शाम चटपल्लीवार आणि निखिल काळे यांचे मोठे बंधू विठ्ठल सुधाकर काळे उपस्थित होते.
निखिल काळे दि. २ जुलै रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर पानवडाळा या स्वगावी आले होते. दरम्यान, दि. ९ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास टाकळी-पानवडाळा रस्त्यावर असलेल्या पुलावरून टाटा मॅजिक ऑटो पुरात वाहून गेल्याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता विठ्ठल आणि निखिल हे दोघेही बंधू घटनास्थळी दाखल झाले. लगेच निखिल यांनी कसलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली व ऑटोतील प्रवाशांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात त्यांना यश मिळून पाच जणांचे प्राण वाचले. याबद्दल सर्वांनी निखिल यांचे आभार मानले. तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या साहसाचे कौतुक करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)