💻

💻

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शासनाने तात्काळ जाहीर करावी:- सुदाम राठोड #Jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, या अतिवृष्टीच्या अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची अतोनात नुकसान झालेली असून, जगाचा पोशिंदा हयाल दिला झाला आहे, या पोशिंद्याला जगावं की मरावं असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे,तरी या झालेल्या गंभीररूपी प्रसंगाला म्हणजेच शेतकऱ्यांना प्रति एकर 25000 ते 30000 रुपयांची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुख सुदामभाऊ राठोड यांनी केली आहे.
यावेळी उपस्थित विदर्भ सचिव शेतकरी संघटना जिवती ता उपाध्यक्ष विनोद पवार, सौरभ राठोड,अनिल राठोड,रोहिदास चव्हाण उपस्थित होते मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत